डॉ. सूर्यनारायण रणसुभे मराठी आणि हिंदी साहित्यकार आहेत. त्यांचा जन्म झाला ७ ऑगस्ट १९४२ रोजी कर्नाटकातील राज्यातील गुलबर्गा येथे झाला. प्राथमिक पासून पदवीपर्यंतचे शिक्षण शासकीय महाविद्यालय, गुलबर्गा येथे घेतले. इलाहाबाद विश्वविद्यालय, इलाहाबाद येथे (१९६५) एम.ए. हिंदी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ही पदवी प्राप्त केली. भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे १९७९ला ‘देश विभाजन और हिंदी कथा साहित्य’ या विषयात पीएच. डी. ही पदवी प्राप्त केली.
सूर्यनारायण रणसुभे यांनी लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयात हिंदी विभागात हिंदी विषयाचे अध्यापक म्हणुन सन १९६५ ते २००२ पर्यंत एकूण ३७ वर्ष अध्ययन कार्य केले आहे. ते एक समीक्षक आणि अनुवादक आहेत.
सूर्यनारायण रणसुभे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.