प्रफुल्ल शिलेदार (जन्म नागपूर ३० जून १९६२) हे मराठीतील कवी आणि अनुवादक आहेत. त्यांचे मराठीत चार कविता संग्रह, सहा अनुवादित पुस्तके, सहा संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, कन्नड़, गुजराती, पंजाबी, तेलुगु, ओडिया, दखनी, स्लोवाक, टर्किश, जर्मन इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झाले असून हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि ओडिया भाषांमध्ये त्यांच्या कविता संग्रहरुपात प्रकाशित झाल्या आहेत.
अनेक महत्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संकलनात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. ते भारतातील तसेच युरोप, अमेरिका, मध्यपूर्वेतील देशातील साहित्यिक आयोजनात सहभागी झाले आहेत.
कवितेकरता त्यांना केशवसुत पुरस्कार, शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार, बाराशिव पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार इत्यादी सन्मान लाभले आहेत तर अनुवादाकरता साहित्य अकादेमी पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, गांधी स्मारक निधी पुरस्कार मिळाले आहेत.
‘युगवाणी’ या वाङमयीन नियतकालिकाचे ते २०१८ पासून संपादक आहेत. आर्ट ओमाय, न्यू यॉर्क या प्रतिष्ठित संस्थेची आंतरराष्ट्रीय लेखक निवासवृत्तीअंतर्गत त्यांनी काही काळ अमेरिकेत वास्तव्य केले.
प्रफुल्ल शिलेदार
थोडक्यात पण महत्त्वाचे.