सुराज्य हे महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.
सोलापुरातील राजकीय आणि गुन्हेगारीच्या बातम्यांमधील नेहमी एक पाऊल पुढे असणारे दैनिक म्हणून सुराज्यची ओळख आहे. या दैनिकाने नुकतेच १६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. दैनिक सुराज्यने आतापर्यंत अनेक विषय हाताळले आहेत. सुराज्यने या वेळी वर्धापन दिनाचा खर्च टाळून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात जे मरण पावले त्यांच्या कुटुंबीयासाठी सांत्वन निधी दिला आहे.
सोलापूर शहरातील डफरीन चौक ते कामत हॉटेलपर्यंत रोडवरील सुराज्यने दुतर्फा झाडे लावली आहेत
२०१८ साली सोलापूरमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्त कमी पडले होते. त्यासाठी रक्तदान शिबीर भरवून त्यामध्ये १००० स्वयंसेवकांना रक्तदान करण्यासाठी सुराज्यने प्रवृत्त केले होते.
सुराज्य (वृत्तपत्र)
थोडक्यात पण महत्त्वाचे.