सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागात आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध) व अक्कलकोटसारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर शहराने तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे. संतांची भूमी व ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे. सोलापूर शहर हा एकूण १६ गावानी मिळून बनलेला आहे म्हणून त्या जिल्ह्याला सोलापूर हे नाव पडलेले आहे. तसेेच अकलूज येथील किल्ला, अकलाई मंदिर आणि वाॅटर पार्क प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोलापूर जिल्हा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.