भीमा नदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे. या नदीची एकूण लांबी ८६० किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात ४५१ किमी क्षेत्र आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ही नदी आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम पुणे जिल्ह्यातील वाळकी(रांजणगाव बेट) येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे. महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो. भीमा नदीवर एकूण बावीस लहान-मोठी धरणे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →