सोलापुर उच्चार शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापुर हे सोलापुर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापुरला कापड गिरण्यांचे शहर म्हणले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलपूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.
सोलापुराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली, वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापुर तलाव बांधून त्यांनी सोलापुराची पाणी समस्या सोडवली.
हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील 'सोलापूरी चादरी' प्रसिद्ध आहेत.
पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापुर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापुरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच "गड्डा" ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापुरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते.
सोलापूर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.