बार्शी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बार्शी

बार्शी' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका उस्मानाबाद जिल्हालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हणले जाते. येथील वृक्ष संवर्धन समिती,जाणीव फाऊंडेशन, उत्तरेश्वर फाऊंडेशन व उड़ान फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे . बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. बार्शी हे शहर कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय,औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे. बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.

बार्शीची नाट्य परंपरा ही सुद्धा अत्यंत जुनी आहे. अनेक टी.व्ही सिरिअल आणि चित्रपटामध्यही बार्शीच्या कलाकारांनी काम केले आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. बार्शीमधील जयशंकर मिल ही भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शीमध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. बार्शीमध्ये 12 ज्योर्तिलिंग आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले अशी आख्यायेका सांगितली जाते.तसेच ईथे "उत्तरेश्वराचे" देखील मोठे मंदिर आहे त्यास बार्शीचा मोठा "महादेव" म्हणतात तसेच बार्शी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणतात..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →