सुब्बुलक्ष्मी जगदीशन (जन्म २४ जून १९४७) एक भारतीय राजकारणी आहे. . द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) या राजकीय पक्षाच्या सदस्या म्हणून तमिळनाडूच्या तिरुचेंगोडे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताच्या १४व्या लोकसभेच्या त्या सदस्य होत्या. त्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या उपसरचिटणीस आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या. त्यापूर्वी, तामिळनाडू विधानसभेच्या मोडाकुरिची मतदारसंघात (१९७७) व इरोड मतदारसंघात (१९९६) त्या निवडून आल्या होत्या.
१९७७-१९८० तमिळनाडूच्या वस्त्रोद्योग, खादी, हातमाग, लघुउद्योग, प्रतिबंध आणि उत्पादन शुल्क या मंत्रालयात त्या मंत्री होत्या. १९८९-१९९१ तमिळनाडूच्या समाजकल्याण मंत्रालयात त्या मंत्री होत्या.
२९ ऑगस्ट २०२२ रोजी एमके स्टॅलिन यांना लिहिलेल्या पत्रात, सुब्बुलक्ष्मीयांनी "राजकारणातून निवृत्ती" घेण्याची इच्छा व्यक्त करत सर्व राजकीय पदांचा आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचा राजीनामा दिला.
सुब्बुलक्ष्मी जगदीशन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!