जोबा माझी ह्या झारखंडमधील एक राजकारणी आहे. त्या ५ वेळा आमदार आहेत आणि हेमंत सोरेन सरकारमध्ये २०१९ ते २०२४ पर्यंत समाजकल्याण, महिला आणि बालविकास आणि पर्यटन मंत्री होत्या. त्यांनी झारखंडमधील २०२४ ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक सिंगभूम लोकसभा मतदारसंघातून जिंकली.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या सदस्या म्हणून २०१४ मध्ये त्या मनोहरपूर विधानसभा मतदारसंघातून झारखंड विधानसभेवर निवडून आल्या होत्या.
जोबा माझी
थोडक्यात पण महत्त्वाचे.