लक्ष्मीराणी माझी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लक्ष्मीराणी माझी (२६ जानेवारी, इ.स. १९८९:बगुला, घाटशिला, झारखंड, भारत - ) ही एक भारतीय तिरंदाज आहे. हिने २०१६ च्या रियो उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

माझी संथाल जमातीची आहे.

लक्ष्मीराणीने तिच्या तिरंदाजीच्या कारकिर्दीची सुरुवात कोपनहेगन येथील २०१५ च्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात रजत पदक मिळवून केली. या कामगिरीमुळे तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवता आली. रियो ऑलिंपिकमध्ये तिने महिलांच्या वैयक्तिक आणि सांघिक रिकर्व्ह प्रकारात भाग घेतला, जिथे भारतीय संघ उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. सध्या ती बिलासपूर येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात कार्यरत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →