दीपिका कुमारी (जन्म: १३ जून १९९४) ही एक भारतीय तिरंदाज आहे. सध्या ती जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर आहे.ती जगातील एक नंबरचा तिरंदाज आहे.२०१० च्या राष्ट्रकुल खेळात तिने महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने डोला बॅनर्जी आणि बॉम्बायला देवीसह महिलांच्या टीम रिकर्व्ह स्पर्धेत सुवर्ण पदक देखील जिंकले. दीपिका कुमारी लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरली, तिथे तिने वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये भाग घेतला.
२०१२ मध्ये भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिला अर्जुन पुरस्कार हा भारतातील दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फेब्रुवारी २०१४ मध्ये, तसेच तिला फिक्की स्पोर्टस् ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भारत सरकारने तिला २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
दीपिका कुमारी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?