दीपिका चिखलिया

या विषयातील रहस्ये उलगडा.

दीपिका चिखलिया

दीपिका चिखलिया टोपीवाला (जन्म २९ एप्रिल १९६५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे जी रामानंद सागर यांच्या १९८७ च्या रामायण टेलिव्हिजन मालिकेत सीतेची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. तिला राज किरण बरोबरचा पहिला चित्रपट सून मेरी लैला (१९८३) आणि राजेश खन्ना सोबतच्या तीन हिंदी चित्रपटांसाठी देखील ओळखले जात होते, जे रूपये दस करोद, घर का चिराग आणि खुदाई हे होते.

तिने मल्याळम, कन्नड, तमिळ, गुजराती आणि बंगाली चित्रपटांमध्ये पण काम केले.

चिखलिया यांनी त्यांच्या दूरदर्शन आणि चित्रपट कारकिर्दीनंतर राजकारणात प्रवेश केला आणि १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून वडोदरा मतदारसंघातून भारतीय लोकसभेच्या खासदार झाल्या.

२३ नोव्हेंबर १९९१ रोजी दीपिकाने शिंगार बिंदी आणि टिप्स अँड टोज कॉस्मेटिक्सचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत: निधी टोपीवाला आणि जुही टोपीवाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →