सिंधुदुर्ग विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सिंधुदुर्ग विमानतळ

सिंधुदुर्ग विमानतळ किंवा चिपी विमानतळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण समुद्र किनाऱ्यावरील मालवण आणि वेंगुर्ला या शहरांदरम्यान, चिपी-परुळे गावानजीकचे विमानतळ आहे. हे विमानतळ परुळे गावातील 'चिपी वाडी'मध्ये उभारले आहे. हा विमानतळ मुंबई -गोवा महामार्गापासून २७ किलोमीटर, आणि मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. २०१८ च्या उत्तरार्धात या विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आणि ५ मार्च२०१९ रोजी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन झाले. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली

या विमानतळावर २,५०० मीटर लांबीचा रनवे असून त्यावर रुंदीने कमी असलेली एरबस ए३२० आणि बोईंग ७३७ सारखी विमाने उतरू शकतात. विमानतळाची इमारत सुमारे ४०० विमान प्रवाशांची सोय करू शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →