मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GOX, आप्रविको: VOGA), हा भारताच्या गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यातील मोपा येथे असलेला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ उत्तर गोवा आणि शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या जिल्ह्यांना सेवा पुरवतो. दाबोळी येथील दाबोळी विमानतळानंतर हा गोव्यातील दुसरा विमानतळ आहे.
हा विमानतळ जीएमआर गोवा इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड (जीजीआयएएल) या कंपनीने बांधला. हा ३,००० कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये या विमानतळाने ४६ लाखांहून अधिक प्रवाशांची हाताळणी केली, जी त्याच्या वार्षिक ४५ लाख प्रवाशांच्या सध्याच्या कमाल क्षमतेपेक्षा थोडी जास्त आहे. हा विमानतळ सरासरी दररोज १०० विमानांच्या हालचाली आणि सुमारे १५,००0 प्रवाशांची हाताळणी करतो. हा भारतातील १६ वा सर्वात व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळाला भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
या विमानतळाचे उद्घाटन ११ डिसेंबर, २०२२ रोजी झाले. ५ जानेवारी, २०२३ रोजी इंडिगोच्या विमानाने येथून पहिले उड्डाण केले. तो आर्थिक वर्ष २०१९-२०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आणि कोविड-१९ महामारीमुळे कामात विलंब झाला.
हा विमानतळ बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वाने चार टप्प्यांत बांधला जात आहे. पहिल्या टप्प्यात हा विमानतळ ४४ लाख प्रवाशांना सेवा देईल आणि चौथ्या टप्प्याच्या अखेरीस ही क्षमता १.३१ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचेल. या प्रकल्पाचा सवलत कालावधी (Concession period) ४० वर्षांचा असून तो पुढे २० वर्षांनी वाढवता येऊ शकतो.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.