देवघर विमानतळ (आहसंवि: DGH, आप्रविको: VEDO) हा भारताच्या झारखंड राज्यातील देवघर शहरातील छोटा विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यभागापासून १२ किलोमीटर (७.४ मैल) अंतरावर आहे. हा विमानतळ प्रामुख्याने झारखंडच्या ईशान्येकडील भाग आणि पश्चिम बंगाल आणि बिहारमधील काही जिल्ह्यांना सेवा देण्यासाठी बांधला गेला. देशभरातून लाखो यात्रेकरू जवळील बैद्यनाथ मंदिर तसेच जैन तीर्थस्थळ समेद शिखरजीला ये-जा करतात. या विमानतळाचा विस्तार ६५४ एकर (२६५ ha) असून येथील धावपट्टी २,५०० मीटर लांबीची आहे. येथे एरबस ए३२०, ए३२१ आणि बोईंग ७३७ प्रकारची विमाने उतरू शकतात. या विमानतळाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ मे २०१८ रोजी केली आणि १२ जुलै २०२२ रोजी याचे उद्घाटन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवघर विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?