सावंतवाडी (मालवणी/कोकणी: वाडी) हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्हातील तालुक्याचे ठिकाण आहे. सावंतवाडी शहराची नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सावंतवाडी हे पुर्वीच्या 'सावंतवाडी संस्थानाचे' राजधानीचे शहर होते.
सावंतवाडी येथील लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील चितारआळीत अतिशय सुंदर आणि हुबेहुब फळे आणि भाज्यांच्या प्रतिकृती बनवल्या जातात. येथील निसर्गरम्य वातावरणामूळे हे आता पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनत चालले आहे.मोती तलाव (बोटींग सुविधा), आत्मेश्वर तळी(भरती ओहटी),नरेंद डोंगर, हनुमान मंदिर, राजवाडा, भोसले उद्यान, शिल्पग्राम,पर्यटन स्थळे आहेत.
भालेकर खानावळ,बांदेकर खानावळ,आरेकर खानावळ, हॉटेल चैतन्य, हॉटेल दळवी,लाड खानावळ, ही मच्छी,मटणसाठी सुप्रसिद्ध हॉटेल असून शुद्ध शाकाहारी साठी साधलेमेस,विसावा, रेणुका ही हॉटेल सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक मॉर्डन रेस्टॉरंट उपलब्ध आहेत.हॉटेल मेंगो, पर्ल,लेक व्यू,पॉम्पस, रेणुका, तारा, सेव्हन हिल्स,आदि अनेक हॉटेल राहण्यास उपलब्ध.
सावंतवाडी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!