कुडाळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचे मुख्यालय व जिल्ह्यातील सावंतवाडी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे नगर आहे. कुडाळ कोकणच्या तळकोकण भागात मालवणच्या ३० किमी पूर्वेस, वेंगुर्ल्याच्या ३० किमी उत्तरेस तर मुंबईच्या ४७५ किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली कुडाळची लोकसंख्या सुमारे १६ हजार इतकी होती.
राष्ट्रीय महामार्ग १७ कुडाळमधूनच जातो तर कुडाळ रेल्वे स्थानक कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.
कुडाळ तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय असून देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी हे या कुडाळ तालुक्यातच येते.
कोकणच्या तळकोकण पट्ट्यात वसलेले हे शहर मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर असल्यामुळे ते ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.
कुडाळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!