भारतातील कोकण हा प्रदेश भारताच्या पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ५६० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे. कोकणाला संस्कृतमध्ये अपरान्त म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोकण
थोडक्यात पण महत्त्वाचे.