राष्ट्रीय महामार्ग ६६

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पूर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १६४० किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला तामिळनाडूमधील कन्याकुमारी ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्‍नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर, कालिकत, कोची, कोल्लम, तिरुअनंतपुरम, नागरकोईल ही रा.म. ६६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ६६ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी रा. म.६६ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. ६६ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →