राष्ट्रीय महामार्ग ८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,४२८ किमी धावणारा हा महामार्ग भारताची राजधानी दिल्लीला भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडतो. गुरगांव, जयपुर, अजमेर, उदयपुर, अमदावाद, वडोदरा व भरुच ही रा. म. ८ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ८ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे. दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग व राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ (राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १) हे रा. म. ८ चे भाग आहेत.
या महामार्गाच्या मुंबई शहरातील भागाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असे नाव आहे.
राष्ट्रीय महामार्ग ८ (जुने क्रमांकन)
यामागील विज्ञान आणि इतिहास.