महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य असून या राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा हा सर्वात मोठा तर मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्रामधील जिल्हे
यामागील विज्ञान आणि इतिहास.