जिल्हा विभाजन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ब्रिटिशांच्या काळात दक्षिणी हिंदुस्थानात एकूण ३० मराठीभाषिक जिल्हे होते. त्यांतले कारवार आणि बेळगाव हे सध्या कर्नाटकात आहेत. उरलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून आता बरेच नवे जिल्हे झाले आहेत.



यापूर्वी झालेली जिल्हा विभाजने



१) रत्‍नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा केला – १ मे १९८१,

२) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला – १ मे १९८१,

३) धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्हा वेगळा केला – १६ ऑगस्ट १९८२,

४) चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा वेगळा केला – २६ ऑगस्ट १९८२,

५) बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा केला – ४ ऑक्टोबर १९९०,

६) अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा केला – १ जुलै १९९८,

७) धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा वेगळा केला – १ जुलै १९९८,

८) परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केली – १ मे १९९९,

९) भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली – १ मे १९९९ आणि

१०) ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली – १ ऑगस्ट २०१४



नामबदल

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →