भारतीय राज्यव्यवस्थेनुसार भारत देश राज्यांत तर राज्ये जिल्ह्यांत विभागलेली आहेत. भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी व इतर काही कारणामुळे शासनाकडून जिल्ह्यात व राज्यात वेळोवेळी बदल केला जातो. त्यामुळे जिल्ह्यांची व राज्यांची संख्या ही बदलत असते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ६४० जिल्हे होती, तर २००१ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ५९३ जिल्ह्याची नोंद करण्यात आली होती. शासनाकडून या जिल्ह्यांच्या प्रशासनासाठी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते, जसे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर. आणि जिल्हा हा पुन्हा उपविभाग, तालुका, तहसील आणि मंडळ यामध्ये विभागला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतातील जिल्ह्यांची यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.