हनमकोंडा जिल्हा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हनमकोंडा जिल्हा

हनमकोंडा जिल्हा किंवा हनुमकोंडा जिल्हा, (पूर्वीचा वारंगल शहरी जिल्हा) हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. हनमकोंडा जिल्हा तेलगंणाच्या मध्य भागात स्थित आहे व २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १०.१३ लाख इतकी होती. हनमकोंडा हे वारंगल महानगरामधील एक शहर हनमकोंडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्याची सीमा जनगाव, करीमनगर, वारंगल, भूपालपल्ली आणि सिद्धीपेट जिल्ह्यांना लागून आहे.

२०१४ सालापूर्वी हनमकोंडा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या भाग होता. काकतीय साम्राज्यकाळामध्ये हनमकोंडा एक महत्त्वाचे स्थान होते. २०१६ साली वारंगल जिल्याचे विभाजन करून वारंगल शहरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ऑगस्ट २०२१ मध्ये, वारंगल शहरी जिल्ह्याचे नामकरण हणमकोंडा जिल्हा असे करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →