वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. २०१४ साली तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याततून तेलंगण राज्यात आला. २०१६ साली वारंगल जिल्ह्याचे विभाजन करून हनमकोंडा जिल्हा व वारंगल ग्रामीण जिल्हा असे दोन जिल्हे निर्माण केले गेले. ऑगस्ट २०२१ मध्ये वारंगल ग्रामीण जिल्ह्याचे नाव बदलून पुन्हा वारंगल जिल्हा असेच ठेवले गेले. आजच्या घडीला हनमकोंडा व वारंगल ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय हनमकोंडा येथेच आहे.
काकतीयच्या राजवटीत त्यांच्या राज्याच्या राजधानीचे नाव ‘ओरुगल्लू’ किंवा एकशिला नगर असे होते. हा किल्ला एकाच दगडाने बांधला गेला आणि नंतर त्याला ‘वरंगल’ असे म्हणतात.
वारंगळ जिल्हा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.