वैश्य समाज हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती शेती, पशुपालन, व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायची. आधुनिक काळात या वर्णातील लोक अनेक प्रकारची कामे करताना दिसून येतात.
जातीव्यवस्था ही पेशवे काळात जास्त प्रमाणात रूढ झाली. ह्या काळात जातीव्यवस्थेचे नाव वर्गीकरण १८ अलुतेदार, १२ बलुतेदार आणि वतनदार असे होते. बलुतेदार हे सुतार, लोहार, चांभार, महार, मांग, कुंभार, न्हावी, धोबी, गुरव, जोशी, भाट.
अलुतेदार हे सोनार, जंगम, शिंपी, कोळी, माळी, डवरी, गोसावी, रामोशी, तेली, तांबोळी व गोंधळी इत्यादी.ह्या लोकांकडून सामानाची देवाणघेवाण करणारा एक व्यापारी वर्ग होता. त्या वर्गातील लोकांना वैश्यवाणी म्हणत असे. हा वैश्यवाणी समुदाय व्यापार आणि व्यवसायासाठी वेगवेगळ्या भागात गेला. कालांतराने त्याच ठिकाणी त्यांनी आपला समुदाय निर्माण केला. त्यावरून वैश्यवाणी समाजात वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या.
ठाणे, रायगड जिल्ह्यातील लोकांना ठाणेकर वैश्य म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना संगमेश्वरी वैश्य म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना कुडाळेश्वर वैश्य म्हणतात. उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांना कारवारी वैश्य म्हणतात. कोल्हापूरातील व पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना देशस्थ वैश्य म्हणतात. बेळगावातील लोकांना बेळगावी वैश्य म्हणतात.
शास्त्रीय वर्ण प्रणालीतील तिसरा उच्चतम वैश्य समुदाय हा गोव्यातील कुडाली व नीसचा एकल गट आहे जो नंतर व्यापार आणि व्यवसायासाठी इतर शहरी भागात स्थायिक झाला. विशेषतः कुडाळ, म्हापसा, फोंडा, मडगाव इथे राहणारे वैश्य पोर्तुगीज सत्ता असताना व्यापार आणि पोर्तुगिजांनी चालवलेले धर्मपरिवर्तन व अत्याचार यामुळे वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित झाले.
वैश्य
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.