कोळी समाज हा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो.
काही इतिहास संशोधकांच्या मते कोळी आणि भोई या उपजाती आहेत, कारण त्यांच्या चालीरीती, व्यवसाय, देवता समान आहेत.
ऐतिहासिक पुराणानुसार समाजाचा उल्लेख हा रामायणात देखील आढळतो.
शेती हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय असला, तरी उच्च पदस्थ नोकऱ्यांमध्ये सुद्धा अनेक भोई बांधव आढळतात.
कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात.
कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात.
कोळी :
कोळे - म्हणजेच जाळे टाकणारे खोल समुद्रात जाळे टाकणारे,
भोळे- म्हणजे खाडीत किंवा कमी पाण्यात रापण जाळे टाकणारे कमी अनुभव असणारे.
कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत, असे इतिहासकार सांगतात.
बाकी दोन्ही समाजांतील चालीरीती व व्यवसाय समान आहेत.
भोई आणि कोळी यांच्या चालीरीती/संस्कृती समान आढळते.
भोई हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत ओबीसी भटक्या जमातीत समाविष्टीत आहे.
भोई कोळी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?