दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा पुराणांनुसार भिन्न आहेत. हिंदू धर्मातील वेदांत - योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता (शब्दशः, "मुक्त आत्म्याचे गाणे") ही दत्तात्रेयांना समर्पत आहे.
कालांतराने, दत्तात्रेयांनी शैव, वैष्णव आणि शक्ती धर्मातील अनेक संन्यासी चळवळींना प्रेरणा दिली - विशेषतः भारतातील दख्खन प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालयी प्रदेश या भागांत, जेथे शैव धर्म प्रचलित आहे. भक्ती चळवळीतील संत-कवी तुकाराम यांच्या कवितांमध्ये त्यांचे साधे जीवन, सर्वांशी दयाळूपणा, त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि जीवनाचा अर्थ यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे.
रिगोपौलोसच्या मते, शैव धर्माच्या नाथ परंपरेत, दत्तात्रेय हे नाथांच्या आदिनाथ संप्रदायाचे आदि-गुरू (प्रथम शिक्षक) म्हणून पूज्य आहेत आणि तंत्रविद्येवर प्रभुत्व असलेले पहिले "योगाचे स्वामी" आहेत. परंतु बहुतेक परंपरा आणि विद्वान आदिनाथ हे शिवाचे प्रतिक मानतात. मॅलिन्सनच्या मते, दत्तात्रेय हे नाथ संप्रदायाचे पारंपारिक गुरू नाहीत परंतु नाथ परंपरेने १८ व्या शतकात विष्णु-शिव समक्रमणाचा एक भाग म्हणून गुरू म्हणून त्यांची निवड केली होती. मॅलिन्सन नुसार, याचा पुरावा मराठी ग्रंथ नवनाथभक्तिसार मध्ये सापडतो, ज्यामध्ये नऊ नारायणांसह नऊ नाथांची ओळख करून महानुभाव पंथात नाथ संप्रदायाचे समक्रमण झाले आहे.
मार्गशीर्ष या हिंदू महिन्यातील शुद्ध पौर्णिमा दत्तात्रेयांना समर्पित आहे आणि हा दिवस दत्त जयंती म्हणून ओळखला जातो.
दत्तात्रेय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.