कोकण मराठी साहित्य परिषद (लघुरूप - कोमसाप). हिची स्थापना दिनांक २३ मार्च, १९९१ या दिवशी, ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे हे जिल्हे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत (इ.स. २०१४) कोमसापने ५१ जिल्हा साहित्य संमेलने, ४ महिला साहित्य संमेलने आणि १५ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही.
कोमसापच्या शाखा असलेली गावे : अंबरनाथ, कणकवली, कल्याण, गुहागर, जव्हार, डहाणू, पावस, भिवंडी, मंडणगड, महाड, माणगाव, मालगुंड, मुरबाड, मुलुंड, रत्नागिरी, राजापूर, रोहा, वांद्रे, वाशी, विक्रमगड, सावंतवाडी, वगैरे.
कोमसापतर्फे ’झपूर्झा’ हे मराठी द्वैमासिक प्रसिद्ध होते. हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे.
अनेक प्रसिद्ध व्यक्ती कोमसापशी संबंधित आहेत/होत्या. : - विश्वस्त : अरुण नेरूरकर, सारस्वत बॅंकेचे कै. एकनाथ ठाकुर, न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे व डॉ. वि.म. शिंदे.
संस्थापक व प्रमुख विश्वस्त मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष न्यायमूर्ती भास्कर शेट्ये आणि असंख्य कार्यकर्ते.
कोकण मराठी साहित्य परिषद
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.