बाबाराव गंगाराम मुसळे (जून १०, इ.स. १९४९ -हयात) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या या कादंबरीचे पु.ल. देशपांडे यांनी विशेष कौतुक केले होते. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झिंगू लुखू लुखू', 'मोहरलेला चंद्र', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश', 'स्मशानभोग'इत्यादि दहा कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या.
पखाल कादंबरीला 1994-95चा आणि वारूळ कादंबरीला 2004-05चा हे महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार प्राप्त झाले.
वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा साहित्य पुरस्कार मिळाला.
2017 सालचा प्रवरानगर लोणीचा 51 हजार रूपयांचा कै पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार त्यांच्या झळाळ कादंबरीला प्राप्त झाला.
कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांच्या कविता, कथा आणि कादंबऱ्या नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होतात. आर्त ही कादंबरी तर पश्चिम बंगालमधल्या भोई समाजाच्या दामायची तीव्र संघर्षकथा आहे.
बाबाराव मुसळे
या विषयावर तज्ञ बना.