बालकुमार साहित्य संमेलन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे

बालसाहित्यकार अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ आणि त्यांचे सहकारी सुधाकर प्रभू, श्यामला शिरोळकर, श्रीधर राजगुरू, लीला दीक्षित इत्यादींनी इ.स.१९७५ मध्ये मराठी बालकुमार साहित्य संमेलन या नावाने संस्था स्थापन केली. पुढे २००० साली संस्थेच्या नावातील संमेलन हा शब्द काढून त्याजागी संस्था हा शब्द टाकण्याचा बदल संमत झाला. त्यानंतर २००३ मध्ये दुसऱ्यांदा संस्थेच्या नावात बदल करून ते अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु धर्मादाय आयुक्तांकडे पाठविलेल्या या बदलाची पूर्तता झाली आहे, की नाही याची खातरजमा करून न घेतल्याने हा बदल केवळ कागदोपत्रीच राहिला आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या अनधिकृत नावानेच संस्था काम करीत राहिली. याच तांत्रिक कारणासाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे काम २०१५ मध्ये संस्थगित केले व तांत्रिक अडचण दूर करून मूळ संस्था पुन्हा सुरू करावे, असे ठरले; परंतु ते काम लवकर होण्याची चिन्हे दिसेनात, यामुळे बालसाहित्य चळवळीला खीळ बसली. बालसाहित्य क्षेत्राचे अधिक नुकसान होऊ नये; म्हणून २०१७ साली झालेल्या सर्वसाधारण सभेत अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था या नावाने नवीन संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला व संस्थेची नोंदणी करण्याचे सर्व अधिकार माधव राजगुरू यांना देण्यात आले. अर्जदार म्हणून माधव राजगुरू यांनी 'अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था' या नावाने नवीन संस्थेची नोंदणी केली. सन २०१५ मध्ये संस्थगित केलेली संस्था दि. २३ आॅगस्ट, २०२३ रोजी पुन्हा सुरू झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →