विद्रोही मराठी साहित्य संमेलने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी चौफेर समाचारच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीची लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत.
तथाकथित धर्मांध-फॅसिस्ट शक्तींचा हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी यांचा निषेध करणे हा सर्व विद्रोही साहित्य संमेलनांचा एक ठराविक मेनू असतो. :
या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की ’विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ हे आहे. या संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत. महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषद या नावाची संस्थाही हे संमेलन भरवते.
विद्रोही साहित्य संमेलन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?