अपंग साहित्य संमेलन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

१ले राज्यस्तरीय अपंग साहित्य संमेलन सातारा येथे १५ मे २०११रोजी झाले होते. संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम महाजन होते.

३रे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे, २९-३० डिसेंबर २०१२ या दिवसांत झाले. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.

एक अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन पुणे येथे २२-२३ फेब्रुवारी २०१४ या दिवसांत, युवा अपंग साहित्यिक सोनाली नवांगुळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अपंग साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेने हे संमेलन आयोजित केले होते. संमेलनाच्या उद्‌घाटक भारताच्या माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील होत्या.

पहा : मराठी साहित्य संमेलने ; अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →