विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी जानेवारी १४, इ.स. १९२३ रोजी अमरावती येथे स्थापन केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय नागपूरला हलवण्यात आले. आजही ते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलन भरवते.
विदर्भ साहित्य संघाचे ’युगवाणी’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गोंदिया शाखेमध्ये 'भवभूती रंगमंदिर' नावाचे नाट्यगृह आहे. विदर्भ साहित्य संघाच्या खामगाव शाखेत १९५८मध्ये ’कोल्हटकर स्मारक मंदिर’ उभारण्यात आले आहे.
विदर्भ साहित्य संघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.