ही साहित्य संमेलने नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा (चंद्रपूर शहरातील शाखा) इ.स. १९५४साली स्थापन झाली.
कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे. १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने विदर्भातील पहिले साहित्य संमेलन भरविण्यात आले. खापर्डे यांनी तेव्हा आताचा विदर्भ, मराठवाडा, हैदराबाद आणि मध्य भारत येथील रसिकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ग्वाल्हेर ते छिंदवाडा अशा विविध हिंदी राज्यातील मराठीभाषक या संमेलनासाठी अमरावतीत एकत्र आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, १४ जानेवारी रोजी खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्याची घोषणा केली. या नव्या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून हैदराबादचे न्या. केशवराव कोरटकर यांना बहुमान देण्यात आला. स्वतः खापर्डे यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. संस्थेचे नाव ‘विदर्भ साहित्य संघ’ असले तरी त्यात मराठवाडा आणि मध्य भारताचा मोठा भूप्रदेश सामावला होता.
विदर्भ साहित्य संमेलन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.