सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ (बॉस्नियन: Međunarodni aerodrom Sarajevo; क्रोएशियन: Međunarodna zračna luka Sarajevo; सर्बो-क्रोएशियन: Међународни аеродром Сарајево) (आहसंवि: SJJ, आप्रविको: LQSA) हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाच्या सारायेव्हो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ २ जून १९६९ रोजी उघडला गेला व सुरुवातीस येथून प्रामुख्याने झाग्रेब व बेलग्रेड येथे विमानसेवा चालत असे. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी सारायेव्हो विमानतंळामध्ये सुधारणा करण्यात आल्या.
हा विमानतळ सारायेव्होच्या ६ किमी पश्चिमेस स्थित असून बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बी अँड एच एरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.