बी अँड एच एरलाइन्स

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बी अँड एच एरलाइन्स

बी अँड एच एरलाइन्स (बॉस्नियन: B&H Airlines) ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी होती. १९९४ साली एर बोस्ना नावाने स्थापन झालेली ही कंपनी २००३ साली दिवाळखोरीमध्ये निघाली. २००५ साली बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सरकारने २००५ साली कंपनीची पुनर्रचना करून बी अँड एच एरलाइन्स ही नवी कंपनी निर्माण केली. ही कंपनी २०१५मध्ये बंद पडली.

बी अँड एच एरलाइन्सचे मुख्यालय सारायेव्हो येथे असून सारायेव्होच्या सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे. सध्या ह्या कंपनीकडे केवळ २ ए.टी.आर. ७२ बनावटीची विमाने आहेत व ती सारायेव्हो, बंजा लुका, कोपनहेगन व झूरिच ह्या चार शहरांना विमानसेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →