सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ लाख लोकसंख्या असलेले सारायेव्हो आग्नेय युरोप व बाल्कन प्रदेशामधील एक प्रमुख शहर आहे.
अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान ओस्मानी साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरी, युगोस्लाव्हिया इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची हत्त्या हे पहिले महायुद्ध चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र व १९४३-१९९२ दरम्यान युगोस्लाव्हिया देशांमधील एक प्रमुख शहर होते. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा येथेच खेळवल्या गेल्या होत्या.
युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या बॉस्नियन युद्धामध्ये सारायेव्होची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली. ह्या युद्धादरम्यान जवळजवळ ४ वर्षे सारायेव्हो शहराला सर्बियन सैन्याने संपूर्न वेढा घातला होता. १९९६ पासून सारायेव्हो शहर पुन्हा झपाट्याने प्रगती करत आहे.
बी अँड एच एरलाइन्सचा हब असलेला येथील सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील सर्वात मोठा विमानतळ आहे.
सारायेव्हो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.