सातारचे त्या काळाचे ज्येष्ठ नेते रावबहादुर रावजी रामचंद्र काळे यांनी १९ जानेवारी १९२४ रोजी सातारा शहरात ’ऐक्य’ नावाच्या साप्ताहिकाची स्थापना केली. साप्ताहिकाची संपादक म्हणून बाग्भट्ट नारायण देशपांडे यांची नेमणूक झाली होती.
’ऐक्य'ला व्यापक स्वरूप देण्यासाठी काळे-देशपांडे यांनी स्थापन केलेल्या संपादन मंडळात सरकार मामासाहेब पंडितराव, कायदेतज्ज्ञ नानासाहेब जोशी व कवी त्र्यं. रा. अभंग यांचा समावेश होता.
ऐक्यची ध्येयधोरणे आपल्या विचारांशी, लेखनाशी मिळतीजुळती वाटल्याने १९३५मध्ये चं.ह. पळणिटकर मुंबईतून सातारला आले, आणि त्यांनी ’ऐक्य’मध्ये कार्यकारी संपादकाची जबाबदारी स्वीकारली. पुढे देशपांडे यांच्या निधनानंतर स. कृ. शिंदकर, न. ग. जोशी "ऐक्य'चे संपादक झाले. मात्र कार्यकारी संपादकपदी पळणिटकरच राहिले.
सातारा जिल्ह्यात ’ऐक्य’चा असलेला दबदबा आणखी वाढवण्यासाठी चं.ह. पळणिटकर यांनी खूप परिश्रम घेतले. घणाघाती आणि निर्भीड शैलीच्या त्यांच्या धारदार लेखनाने, ’ऐक्य'चा वाचक वर्ग वाढला. ते सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे मुखपत्र झाले. क्रांतिसिंह नाना
पाटील यांच्या १९४२मधल्या "प्रती सरकार'चे सातारा जिल्हा हेच केंद्र होते. त्या काळात चं.ह. पळणिटकर यांनी ’ऐक्य'मध्ये जहाल लेखन करून स्वातंत्र्य चळवळीचा धडाडीने प्रचारही केला.
साप्ताहिक ऐक्य
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.