गजानन त्र्यंबक माडखोलकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, २८ डिसेंबर १८९९; - नागपूर, २७ नोव्हेंबर १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.

ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला.

संयुक्त महाराष्ट्र समिती सदस्य :- 1) केशवराव जेथे 2) ग. त्र्य. माडखोलकर 3) द. वा. पोतदार 3) शंकरराव देव 4) श्री. शं. नवरे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →