नामदेव चंद्रभान कांबळे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नामदेव चंद्रभान कांबळे (जन्म : शिरपूर-वाशीम, १ जानेवारी १९४८ - ) हे मराठी लेखक, पत्रकार व शिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

विदर्भातील वाशीमच्या चपराशी कॉलनीमध्ये राहणाऱ्या कांबळे यांच्या झोपडीला कुडाच्या भिंती होत्या. वीज किंवा नळ नव्हते. येथेच त्यांनी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित 'राघववेळ' या कादंबरीची रचना केली. २०२१ मध्ये साहित्य आणि शिक्षणातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नामदेव कांबळे यांच्या आठ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह आणि दोन ललित संग्रहांखेरीज चरित्र, वैचारिक ग्रंथ अशी त्यांची एकवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय अन्य पुस्तकांची अनेक हस्तलिखिते त्यांच्याजवळ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →