सान लुइस पोतोसी (मेक्सिको)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सान लुईस पोतोसी हे मेक्सिकोच्या सान लुइस पोतोसी राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या अंदाजे ७,३५,८८६ तर महानगराची लोकसंख्या १०,२१,६८८ इतकी आहे.

या शहराला फ्रांसचा राजा नवव्या लुईचे नाव देण्यात आले होते. लुई या शहराचा रक्षक संत मानला जात असून त्याचा उल्लेख सान लुइस असा केला जातो. इ.स. १५९२मध्ये येथून जवळ जमिनीत सोने व चांदी सापडल्यावर बोलिव्हियामधील पोतोसी शहराचे नाव यास जोडण्यात आले.

समुद्रसपाटीपासून १,८५० मी (६,०७० फूट) उंचीवर अशलेले हे शहर मेक्सिकोतील अकराव्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →