सातारा राज्य हे महाराष्ट्रातील एक संस्थान होते. मूळ मराठा साम्राज्याचा वारसा सांगणारे हे संस्थान १८१८ च्या तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर निर्माण झाले. १८४९ मध्ये ब्रिटिशांनी डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या धोरणाखाली आपल्या ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांचे वंशज या संस्थानाचे शासक व वारस आहेत.
१८१८ मध्ये पेशवा बाजीराव दुसरा यांचा पराभव केल्यानंतर ब्रिटिशांनी राजा प्रताप सिंह भोसले यांना गादीवर बसवले. १८३८ मध्ये त्यांना पदच्युत केले आणि त्यांचे भाऊ शहाजी यांना गादीवर बसवले. १८४८ मध्ये त्यांचा नैसर्गिक वारस नसताना मृत्यू झाला. त्या वेळी, ईस्ट इंडिया कंपनी सरकारने तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केलेल्या कंपनीच्या डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या धोरणानुसार शहाजींच्या दत्तक मुलाला राज्याचे उत्तराधिकारी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि सातारा संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीन करून घेतले.
सातारा संस्थान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.