तंजावूर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

तंजावूर

तंजावर तथा तंजावूर भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे याच नावाच्या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली. ती 1855 पर्यंत टिकली पुढे इंग्रज सत्ता सुरू झाली. भोसले वंशातील सरफोजी राजे 1878 ते 1932 हे थोर राजे होऊन गेले. सरस्वती महाल हे प्रख्यात ग्रंथालय निर्मिती केली. जगातील सर्वात मोठा शिलालेख त्यांनीच येथील प्रख्यात अशा बृहदेश्वर मंदिरात कोरविला आहे. त्यात भोसले वंशाचा इतिहास मराठीत दिलेला आहे. येथील सुबह्याण्य मंदिर प्रसिद्ध आहे. पण भारतातील सर्वात भव्‍यतम असे बृहदीश्वर मंदिर सुबद्ध, प्रेक्षणीय असे महत्त्वपूर्ण आहे (तमिळ:तंजावूर ; तमिळ: தஞ்சாவூர் रोमनलिपी:Thanjavur/Tanjore)हे भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →