साजिद खान पठाण

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

साजिद खान पठाण (१९७५ - ) हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे १५व्या विधानसभेवर निवडून गेले.

पठाण यांच्या वडीलांचे नाव मन्नान खान सुजात खान आहे. त्याने मुंगीलाल बाजोरिया शाळेतून आठवी उत्तीर्ण केली आणि नंतर १९९१ मध्ये अकोला बोर्ड, अमरावती द्वारे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे त्यांनी आपले शिक्षण सोडले.

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पठाण यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. त्यांना ८८,७१८ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे विजय अग्रवाल कमलकिशोर यांचा १,२८३ मतांनी पराभव केला. विजयानंतरच्या जल्लोषा दरम्यान, त्यांच्या काही समर्थकांना पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यापूर्वी, त्यांचा २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

पठाण अकोल्यातील स्थानिक प्रभागातून सुमारे २० वर्षे नहगर सेवक होते.त्यांनी अकोला महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →