साओ पाउलो (पोर्तुगीज: São Paulo ; अर्थ: संत पॉल ;) ब्राझील देशातील, तसेच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्राझीलच्या साओ पाउलो राज्याची राजधानी आहे. साओ पाउलो शहराची वस्ती १,१०,१६,७०३ असून क्षेत्रफळ १,५२३ कि.मी.२ आहे. २५ जानेवारी १५५४ रोजी स्थापलेल्या या शहराचे नाव ख्रिश्चन धर्मातील संत पॉल याच्या पोर्तुगीज भाषेतील नावावरून पडले.
साओ पाउलो देशातील आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र आहे. येथे साओ पाउलो रोखे बाजार आहे.
साओ पाउलो हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक होते. येथील अरेना कोरिंथियान्स येथे स्पर्धेमधील ६ सामने खेळवले गेले.
साओ पाउलो
या विषयावर तज्ञ बना.