ग्वारूलोस (पोर्तुगीज: Guarulhos) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात साओ पाउलो महानगराच्या हद्दीत वसलेल्या ग्वारूलोसची लोकसंख्या २०१४ साली १३.१ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ग्वारूलोस ब्राझीलमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा ब्राझील देशातील व लॅटिन अमेरिकेमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ ग्वारूलोस शहरामध्येच स्थित आहे.
ग्वारूलोस
यामागील विज्ञान आणि इतिहास.