सलाम बॉम्बे! हा १९८८ सालचा हिंदी भाषेचा भारतीय चित्रपट आहे जो मीरा नायर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. सोनी तारापोरवाला यांनी पटकथा लिहिलेला आहे. या चित्रपटामध्ये भारतातील सर्वात मोठे शहर असलेल्या बॉम्बे म्हणजेच मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे दिवसागणिक जीवनाचा इतिहास आहे. यामध्ये शफीक सय्यद, हंसा विठ्ठल, चंदा शर्मा, रघुवीर यादव, अनिता कंवर, नाना पाटेकर आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकित होणारा हा चित्रपट भारताचा दुसरा चित्रपट होता. भारतामध्ये देखिल याला अनेक पुरस्कार मिळाले ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा एक आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या "द बेस्ट १००० मूव्हीज एव्हर मेड"च्या यादीमध्ये हा चित्रपट गणला जातो.
सलाम बॉम्बे!
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.