नीरजा हा २०१६ मधील हिंदी भाषेचा नीरजा भनोतच्या जीवनचरित्रा वर आधारीत रोमांचक चित्रपट आहे. राम माधवानी दिग्दर्शित, या चित्रपटचे लिखाण सायविन क्वाड्रस आणि संयुक्ता चावला शेख यांनी केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओसमवेत अतुल कसबेकर यांच्या "ब्लिंग अनप्लग्ड" कंपनीने ही निर्मिती केली आहे. या चित्रपटात सोनम कपूर मुख्य पात्र आहेत, आणि सोबत आहेत यात शबाना आझमी, योगेंद्र टिकू आणि शेखर रावजियानी.
हा कथानक वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे. ५ सप्टेंबर १९८६ रोजी पाकिस्तानच्या कराची येथे पॅन एम फ्लाइट ७३ चे लीबिया समर्थित अबु निदल ऑर्गनायझेशनने अपहरण केले होते. नीरजा भनोट यांनी वैमानिकांना इशारा देऊन अपहरण करण्याचा प्रयत्न रोखला, आणि विमान जमीनीवर उतरवले. ३७९ प्रवाशांपैकी ३५९ प्रवाशांचा जीव वाचविण्यात मदत करण्याचा प्रयत्न करीत भानोत यांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर २०१४ मध्ये चित्रपटासाठी कसबेकर यांनी राम माधवानी आणि सोनम कपूर यांना निवडले. १९ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रदर्शीत झाल्यावर समीक्षकांनी सकारात्मक स्वागता करत कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले. हा महिला नायिका असलेल्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹१३५.५२ कोटी कमाई केली.
कपूरच्या अभिनयासाठी आणि माधवानी यांच्या दिग्दर्शनासाठी चित्रपटस अनेक पुरस्कार मिळाले. ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कपूरसाठी विशेष उल्लेख असे दोन पुरस्कार जिंकले. ६२व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नीरजाने सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) (कपूर) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (आझमी) यांच्यासह सहा पुरस्कार जिंकले.
नीरजा (चित्रपट)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.