पतंग हा १९९३ चा गौतम घोष दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे, ज्यात शबाना आझमी, शफीक सय्यद, ओम पुरी आणि रबी घोष यांनी भूमिका केल्या होत्या. ह्याची गोष्ट गया जवळील छोट्या रेल्वे स्थानकात वसली आहे आणि त्याच्या जवळच्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांमधील लोकांचे जीवन दर्शवते. बिहारमधील गया आणि मानपूरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
४१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पतंगने हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. ताओर्मिना फिल्म फेस्टमध्ये शबाना आझमीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. बाल अभिनेता शफिक सय्यदने ह्या आधी मीरा नायरच्या अकादमी पुरस्कार-नामांकित चित्रपट सलाम बॉम्बे! (१९८८) मध्ये चायपाऊची मुख्य भूमिका केली होती. पतंग चित्रपटानंतर त्याने दुसरे कोणतेही काम केले नाही.
पतंग (चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.